loader
Breaking News
Breaking News
Foto

वायंगणी येथे २२ रोजी माघी गणेश जयंती उत्सव

मालवण (प्रतिनिधी) - वायंगणी येथील श्री गणेश मंदिर या मंदिरामध्ये माघी गणेश जयंती उत्सव व २६ वा वर्धापन दिन सोहळा दि. २२ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत अभिषेक सोहळा, १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्री सत्यनारायणाची महापूजा, १२ ते १ वाजेपर्यंत महाआरती, १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, ३ ते ४ वाजेपर्यंत हळदीकुंकू समारंभ, दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुश्राव्य भजने, सायंकाळी ७ वाजता आरतीः रात्री ९.३० वाजता महिलांचा २०x२० डबलबारी भजनाचा सामना श्री देव केसरकर हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळ वर्दे, कुडाळ (बुवा - योगिता नंदू पवार, पखवाज श्रेया अनिल धुरी, झांज - काव्या नंदू पवार) विरुद्ध श्री भैराई देवी प्रासादिक महिला भजन मंडळ मोंड गावठाणवाडी (बुवा- स्वराली नाटेकर, पखवाज - मंजिल काळसेकर, झांज - कार्तिश गोसावी) यांच्यात होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg