loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरात जि.प. साठी ९ तर पं.स. साठी १९ उमेदवारी अर्ज दाखल

वरवेली (गणेश किर्वे) - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकिसाठी अर्ज भरण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय पक्षांकडून आता उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत.सेना भाजप युतीकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवारी काही ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आले.तर उर्वरित ठिकाणी बुधवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजप - सेना युतीकडून मंगळवारी दाखल केलेल्या अर्जामध्ये कोंडकारूळ जिल्हा परिषद गटातून भाजप - सेना युतीकडून भाजपच्या अपूर्वा बारगोडे, शृंगारतळी जिल्हा परिषद गटातुन डॉ. राजेंद्र पवार, तळवली पंचायत समिती गणातून मंगेश जोशी, मळण पंचायत समिती गणातून मानसी रांगळे, शीर पंचायत समिती गणातून स्नेहा शिगवण, पडवे पंचायत समिती गणातून भाजपचे माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे या भाजपच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर भाजप- सेना युतीकडून पडवे जिल्हा परिषद गटातून महेश नाटेकर, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून नेत्रा ठाकूर, वेळणेश्वर पंचायत समिती गणातून संदीप गोरीवले,शृंगारतळी पंचायत समिती गणातून गौरव वेल्हाळ, कोंडकारूळ पंचायत समिती गणातून प्रणव पोळेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर उबाठा व मनसे कडूनदेखील सर्व १५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी गुहागर उबाठाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आम.भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी एकूण ४ जिल्हा परिषद व १० पंचायत समिती गणातून उबाठाकडून तर शृंगारतळी जिल्हा परिषद गटासाठी मनसे कडून प्रमोद गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

टाईम्स स्पेशल

पडवे जि. प. गटातून सचिन बाईत,पाचेरी सडा पं. स. गणातून शशिकला मोरे, पडवे पं. स. गणातून रवींद्र आंबेकर,वेळणेश्वर जि. प. गटातून सिद्धी रामगडे, वेळणेश्वर पंचायत समिती गटातून सचिन जाधव, शीर पंचायत समिती गणातून ज्योत्स्ना काताळकर कोंडकारूळ जिल्हा परिषद गटातून मानसी घाणेकर, कोंडकारूळ पंचायत समिती गणातून महेश गोवळकर, मळण पंचायत समिती गणातून साक्षी चव्हाण,शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून मनसेचे प्रमोद गांधी शृंगारतळी पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय पवार, तळवली पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संदीप धनावडे, अंजनवेल जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विक्रांत जाधव, असगोली पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पूर्वी खैर, अंजनवेल पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्राजक्ता जांभारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यासाठी भाजप-शिवसेना, उबाठा व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg