loader
Breaking News
Breaking News
Foto

कारवांचीवाडीत भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी (वार्ताहर)- स्वयंभू श्री आई भराडीन देवीच्या यात्रा उत्सवानिमित्ताने दि. 1 फेब्रुवारीला कारवांचीवाडी येथे जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंभु श्री भराडीन देवीचा यात्रा उत्सव दि. 3 व 4 फेब्रुवारीला होणार असून त्यानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 2 रोजी उर्वरित सामने होतील व दि. 3 फेब्रुवारीला फायनलचे सामने होतील. रत्नागिरी जिल्हयातील नावाजलेले कबड्डीचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये सांघिक बक्षीसांसह वैयक्तिक बक्षीसांची लूट होणार आहे. या यात्रा उत्सवामुळे गावामध्ये आतापासूनच वातावरण निर्मिती झाली असून भव्य कबड्डीचे सामने पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे. हे सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी भाग घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र कांबळे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg