loader
Breaking News
Breaking News
Foto

शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुलचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आणि वार्षिक स्नेहसंमेलन

खेड - नागेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, संचालित शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डी.पी.पाटील (संस्थापक सचिव विश्ववारणा पब्लिक स्कूल तळसंदे कोल्हापूर), मदन गायकवाड (सामजिक कार्यकर्ते, सातारा जिल्हा पोलिस मित्र), एस.एल.पाटील सर(राज्यपुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक शा.वि. मा.वि चोरवणे) उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर महादेव उत्तेकर हे होते. संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार भिकाजी महादेव उतेकर, माजी अध्यक्ष सुरेश धोंडू मोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल गोविंद उतेकर, संस्थेचे कार्याध्यक्ष के.डी उतेकर, संस्थेचे सचिव किशोर जाधव, संस्थेचे CEO प्रवीण शिंदे, संस्थेचे खजिनदार वसंत मोरे, सैनिक वसतिगृह प्रमुख प्रताप के.उतेकर, चेअरमन प्रताप धारोजी उतेकर, वामन उतेकर, सल्लागार दीपक सकपाळ, चोरवणे गावचे पोलीस पाटील विनोद शिंदे, ग्रूप ग्रामपंचायत चोरवणे निवेचे उपसरपंच प्रवीण सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश शिंदे, सुभाष चव्हाण, तसेच चोरवणे निवे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही एस गावडे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी माजी विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मनोगत डी.पी.पाटील यांनी व्यक्त केले. संस्थेचे माजी अध्यक्ष व सल्लागार बी.एम.उतेकर यांनी आतापर्यंत संस्थेने केलेल्या कामांचा व पायाभूत सुविधांची माहिती तसेच विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी निवासी वसतिगृह चालू करुन वसतिगृहातील विद्यार्थ्यांना व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना संस्था पुरवीत असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती दिली. स्नेहमेळाव्याला अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी रजनी उतेकर(मुख्याध्यापिका रसाळगड), प्रवीण उतेकर, विनोद शिंदे, प्रवीण शिंदे, किशोर जाधव, महादेव उतेकर, प्रथमेश पालांडे, प्रसाद उतेकर, श्रद्धा उतेकर इत्यादी माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या असे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्या सहकार्याने,पुढाकाराने माजी विद्यार्थी स्नेह मेळावा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. या सर्व प्रक्रियेमध्ये स्वयंस्फूर्तीने अगदी सुरवातीपासून कार्यक्रम यशस्वी होईपर्यंत सहभागी होऊन सहकार्य करणारे माजी विद्यार्थी उतेकर, मंगेश साळुंखे, अनिल उतेकर, भगवती ताई, प्रसाद उतेकर सुदर्शन जाधव, सागर उतेकर, संतोष उतेकर, प्रशांत उतेकर, प्रथमेश पालांडे, तन्वी मोरे, श्रद्धा उतेकर, सुवर्णा शिंदे, प्रतीक मोरे, योगेंद्र मोरे, रुक्मिणी उतेकर, दिपक उतेकर, विनायक जाधव, प्रवीण सावंत, रणजीत सावंत, रजनी ताई, दिपक चव्हाण, सचिन शिंदे, प्रियंका सकपाळ, अर्चना शिंदे, किशोर शिंदे, राजेश साळुंखे, निलेश उतेकर, दिपक गायकवाड, मंगेश उतेकर, मंगेश जाधव, अनाजी उतेकर आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक माजी विद्यार्थी होते.

टाइम्स स्पेशल

आपल्या शाळेप्रती, गुरुजनांप्रती अखंड निःस्वार्थ प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा पाहण्यासाठी मिळाले. एकूण नियोजनाची संपूर्ण बांधणी मांडणी करणारे संस्था नागेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे माजी विद्यार्थ्यांच्या विचारात वतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुदर्शन जाधव यांनी केले आणि कार्यक्रमाची प्रस्तावना उतेकर यांनी केली. २५ जानेवारी रात्री ८ ते ११ या वेळेत वार्षिक स्नेहसंमेलन व २६ जानेवारी सकाळी ८ वाजता सैनिक पॅटर्न निवासी वसतिगृह चे मानवंदना व महापरेट, कवायत मानवी मनोरे, अबस्टॅकल्स, कसरती आणि विद्यार्थी बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg