loader
Breaking News
Breaking News
Foto

कैसा हराया म्हणत ' वादग्रस्त विधान करणाऱ्या MIM च्या सहर शेखचा पोलिसांकडे माफीनामा

कैसा हराया आणि मुंब्राला हिरवा बनवणार ही वाक्य सध्या सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये आहेत. जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देताना एमआयएमच्या सहर शेखने हे विधान केले होते. ज्यावर भाजप, शिवसेनेकडून जोरदार टिका झाली. भाजप नेते किरीट सोमय्या यावर आक्रमक झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस एक्शनमोडमध्ये पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एमआयएमच्या सहर शेख यांच्या वक्तव्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज दुसऱ्यांदा मुंब्रा पोलिसांची भेट घेतली. तक्रारीनंतर पोलिसांनी सहर शेख यांना पोलीस ठाण्यात बोलावून लेखी माफीनामा घेतला. 'कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता', असे सहर शेख यांनी माफीनाम्यात नमूद केले आहे. सहर शेख तरुण असल्याने माफीनामा स्वीकारल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी एमआयएमच्या भूमिकेवर टीका केली.मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सहर शेख यांना कलम 168 नुसार नोटीस दिली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवेदन देऊन सहर शेखच्या भाषणावर आक्षेप नोंदवला होता. त्यावर सहर शेखने माफीनामा देत स्टेटमेंट दिलंय.ते आम्ही किरीट सोमय्याना दाखवल्याचे अनिल शिंदे म्हणाले. त्यांना एक वार्निंग द्या की परत असं झालं नाही पाहिजे, असे सोमय्यांनी आपल्या निवेदनात म्हटले. यानंतर सहर शेख यांना आम्ही दोन वेळा पोलीस स्टेशनला बोलावलं होतं.कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे. माझा दृष्टीने हिरवा माझा पक्षाचा झेंडा पण भारताच्या तिरंग्यासाठी आयुष्यभर मी काम करणार आहे. आम्ही तिरंग्यासाठी मरायला तयार आहोत.आमच्या पक्षाचा झेंडा हा हिरवा आहे. जास्तीत जास्त नगरसेवक आमच्या पक्षाचे निवडून आणून मुंब्राला हिरवा बनवणं असं सहर शेखने म्हटले.

टाइम्स स्पेशल

एमआयएमच्या सहर शेख यांनी आता माफी मागितले आहे. आम्ही मुंबईला हिरवा बनवणारी हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी चिथावणारी भाषण आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलावलं होतं लिखित स्वरूपात सहर ने माफी मागितल्याची माहिती सोमय्यांनी दिली.सहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला आहे. परंतु एमायएमचे नेते आता त्यांच्या पुढच्या पिढींना कट्टरपंथी करत आहेत ही चिंतेची बाब आहे.मालेगावला त्यांनी हिरवं केलं असून मानखुर्दला हिरवा केलं. मुंब्राला हिरवं केल्यात जमा आहे आणि आता मुंबईला हिरव करण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला मान्य नसल्याचे सोमय्या म्हणाले. हे जे मुस्लिम कट्टर पंथी नेते आहेत आणि ज्यांना बाहेरून मदत येते. आता ते त्यांच्या नवीन पिढीला बरबाद करत आहेत. भारतीय पक्षाचे जिथे शासन आहे तिथे आम्ही कुठेही भेदभाव केलेला नसल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg