loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली येथील तपासणी नाक्यावर पोलिसांची विशेष मोहिम

बांदा (प्रतिनिधी) - सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर तसेच शेजारच्या गोवा राज्यात देशी-विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळांची सुरक्षितता, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) वापर व तस्करीविरोधात कडक पावले उचलण्यात येत आहेत. याच अनुषंगाने इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विशेष मोहिमेदरम्यान बांदा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) सिंधुदुर्ग तसेच बीडीडीएस पथकाचे अधिकारी उपस्थित होते. तपासणी नाक्यावरून जाणार्‍या खासगी आराम बस, पर्यटक वाहने तसेच इतर संशयास्पद खासगी वाहनांची श्वान पथकाच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली. वाहनांतील सामान, बॅगा तसेच प्रवाशांची सखोल चौकशी करून कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ किंवा बेकायदेशीर साहित्य वाहतूक होत आहे का, याची काटेकोर पडताळणी करण्यात आली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर ड्रग्ससारख्या घातक पदार्थांचा शिरकाव रोखणे, पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरील शांतता कायम राखणे हा या तपासणी मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. आगामी काळातही अशा प्रकारच्या विशेष तपासण्या आणि अचानक कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg