loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' उत्साहात साजरा

रत्नागिरी : शासन निर्णयानुसार १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत ग्रंथालयात सामूहिक ग्रंथवाचन आणि भव्य 'ग्रंथदिंडी' सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात दिमाखदार ग्रंथदिंडीने झाली. या दिंडीचे नेतृत्व संस्थेचे प्राचार्य डॉ. चं. य. सिमीकेरी यांनी केले. पालखीमध्ये 'ग्रंथराज ज्ञानेश्वरी' व इतर विविध ग्रंथ ठेवून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. सिमीकेरी यांनी विश्वास व्यक्त केला की, "आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती जपणे अत्यंत आवश्यक असून, अशा उपक्रमांमुळे तरुण विद्यार्थी पुस्तकांकडे वळण्यास मदत होईल." या दिंडीमध्ये महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. संस्थेतील विद्यार्थ्यांनी 'ग्रंथ हेच जीवन' आणि 'वाचाल तर वाचाल' अशा घोषणांनी महाविद्यालय परिसर दुमदुमून टाकला.

टाईम्स स्पेशल

ग्रंथदिंडीनंतर ग्रंथालयामध्ये मराठी साहित्याच्या सामूहिक वाचनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठीतील नामवंत कवी, लेखक आणि विचारवंतांच्या साहित्याचे प्रकट वाचन केले. विद्यार्थ्यांचा यातील सहभाग अत्यंत उत्स्फूर्त होता. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन विरेंद्रकुमार वायकोय यांनी केले. ग्रंथदिंडीचे नेटके नियोजन आणि मार्गदर्शन योगेश पवार व डॉ. काणे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय विभाग व विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे या कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साहात झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg