loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची बढती

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक (वर्ग एक) या पदावर बढती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून हे पद रिक्त होते. अखेरीस राज्याचे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या मान्यतेने डॉ. ऐवळे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीसाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद चव्हाण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच युवराज लखमराजे भोसले यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. ऐवळे हे गेली तब्बल ३० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्त्रीरोग तज्ञ म्हणून सेवा बजावत आहेत. सन १९९६ पासून सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यांमध्ये त्यांनी दरमहा सरासरी १०० स्त्री प्रसूती केसेस यशस्वीरीत्या हाताळल्या आहेत. त्यांनी १९९८ ते २००६ या कालावधीत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम पाहिले. त्यानंतर २००६ ते २०१५-१६ या कालावधीत दोडामार्ग येथे सेवा बजावली. २०१६ ते २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत पुन्हा सावंतवाडीत कार्यरत होते. २०१७ ते २०२३ या काळात त्यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात सेवा दिली. सन २०२३ नंतर सध्या ते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

टाईम्स स्पेशल

दीर्घ अनुभव, प्रामाणिक सेवा व मातृ-शिशु आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल वैद्यकीय वर्तुळासह सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg