loader
Breaking News
Breaking News
Foto

"आप" चे उमेदवार सुनील सुर्वे यांचे देवरुख निवडणूक कार्यालया बाहेर हृदयविकाराच्या झटक्याने निधन

देवरूख प्रतिनिधी : संगमेश्वर तालुक्यातील धामणी गणातून आमआदमी पक्षाकडून निवडणूक लढविणारे कुंभारखाणी बुद्रुक येथील सुजीत गणपत सुर्वे (वय ५७) यांचे आज सकाळी तहसिलदार कार्यालयाबाहेर ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.. आज तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज छाननी होती. त्यासाठी सुजीत सुर्वे हे कार्यालयाच्या प्रवेश करताच पोर्चबाहेरच त्यांचे छातीत जोरदार कळ येवून ते खाली पडले. त्यांना त्वरीत सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी करत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला..

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याचे मावस भाऊ अनिल सुर्वे. उबाठा शिवसेनेचे नेते संतोष थेराडे. मुन्ना थरवळ. इशत्याक कापडी. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशिनाथ वाजे. आषिश सुर्वे. व अन्य सहकारी यांनी मदत केली. त्याचे निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.. त्यांची पत्नी. मुले यांचेसह सर्व नातलग मुंबईत असल्याने त्यांचे पार्थिव मुंबई येथे नेण्यात आले.. त्यांनी पकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असून ही तालुक्यातील आपच्या पदाधिकारी यांना याबाबत काही कल्पना नव्हती असे दिसते आहे. याप्रसंगी आपचे स्थानिक नेते वा पदाधिकारी कार्यकर्ते कोणीच उपस्थित नसल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहे..

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg