loader
Breaking News
Breaking News
Foto

पात्रता परिक्षा निवडणुकीच्या दिवशीच, शिक्षकांनी करायचे काय?

लांजा (संजय साळवी) - निवडणुकीचे कामकाज दिलेल्या शिक्षकांनी आपण शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) परिक्षेला जात असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्याने प्रशासनाने शिक्षकांवर अशाप्रकारे अविश्वास दाखविण्यापेक्षा एक तर निवडणूक पुढे ढकलावी किंवा आमच्या शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे. राज्यातील लाखो शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ही शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी होत आहे. प्रशासनाकडून तीन महिन्यांपूर्वीच ७ फेब्रुवारी ही तारीख जाहीर करण्यात आलेली होती. या परीक्षेसाठी लांजा तालुक्यातून सुमारे ९० ते १०० शिक्षक आणि रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो शिक्षक परीक्षेला जाणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणातील शिक्षकांची ही परीक्षा मुंबई येथे आहे. शिक्षक पात्रता परीक्षा ७ फेब्रुवारी निश्चित झालेली असतानाच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची मतदानाची तारीखही ७ फेब्रुवारी जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) शिक्षकांसाठी अनिवार्य केलेली असून त्यासाठीची तारीख ७ फेब्रुवारी ही निश्चित करण्यात आलेली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या ५ फेब्रुवारी रोजी घेण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र आता नव्याने ७ फेब्रुवारीला मतदान आणि ९ फेब्रुवारीला मतमोजणी करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीचे कामकाज दिलेल्या शिक्षकांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

टाइम्स स्पेशल

या पार्श्वभूमीवर ज्या शिक्षकांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे कामकाज दिले आहे, परंतु जे शिक्षक सीटीईटी परीक्षा देणार आहेत अशांनी आपण परीक्षेला जाणार आहोत अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपण परीक्षेला जात आहोत अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगणे म्हणजे एक प्रकारचा शिक्षकांवर अविश्वास दाखविल्या प्रमाणे आहे. अशा प्रकारचा अविश्वास आमच्यावर प्रशासनाने दाखवू नये. निवडणुकीचे कामकाज करायला आम्ही तयार आहोत. परंतु त्याचवेळी शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) परीक्षा आहे. त्यामुळे प्रशासनाने एकतर निवडणूक तारीख पुढे ढकलावी किंवा आमची सीटीईटी परीक्षा तरी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg