loader
Breaking News
Breaking News
Foto

बांद्याचा बाप्पा गणेश मंडळातर्फे स्मशानभुमीला लाखाची मदत

बांदा (प्रतिनिधी) -"बांद्याचा बाप्पा" या नावाने प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदा,च्या वतीने सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण देणारा एक स्तुत्य उपक्रम केला. बांदा व्यापारी संघाच्या माध्यमातुन बांदा येथील वैकुंठ स्मशानभूमीची दुरूस्ती, नुतनीकरण तथा सुव्यवस्थापनाचे कार्य वेगात सुरू आहे. स्मशानभूमीची जीर्ण शेड पूर्णपणे नव्याने बांधली जात आहे. या पत्रा शेड कामासाठी बांद्याचा बाप्पा मंडळातर्फे एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली. बांद्याच्या बाप्पा मंडळाची ही सामाजिक बांधिलकी इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बांदा व्यापारी संघाच्या माध्यमातुन बांदा येथील स्मशानभूमीत पत्र्याची शेड उभारण्याचे काम सुरु आहे. यासाठी या गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून देणगी देत हातभार लावला आहे. मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार यांच्याहस्ते ही एक लाखाची रोख रक्कम व्यापारी संघाच्या अजय महाजन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्वेश गोवेकर, भाऊ वाळके, प्रसाद वाळके, भाऊ (विठ्ठल) वाळके, ओंकार नाडकर्णी, साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर, निखिल मयेकर, सुधीर शिरसाठ, राकेश केसरकर, अजिंक्य पावसकर, स्वप्नील पावसकर, निलेश उर्फ पापू कदम आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

'बांद्याचा बाप्पा' मंडळाने सामाजिक बांधिलकीचा वसा कायम ठेवला आहे. यापूर्वी कोरोना काळात गरजूना अन्नधान्य वितरण, बांद्यातील काही गरजुना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, पूर परिस्थितीत नुकसान झालेल्याना आर्थिक मदत आदी प्रकारची आर्थिक व वस्तुरूपी मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या मंडळाच्या आदर्शवत सामाजिक बांधिलकीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg