loader
Breaking News
Breaking News
Foto

हा तर महायुतीचा विजय; तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची प्रतिक्रिया

मालवण (प्रतिनिधी) - आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघातून भाजपच्या उमेदवार माजी सभापती सीमा सतीश परुळेकर या बिनविरोध निवडून आल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी हा तर भाजप- शिंदे शिवसेना महायुतीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघात भाजपच्या सीमा परुळेकर या बिनविरोध आल्यानंतर भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकारांशी बोलताना हा महायुतीचा विजय असल्याचे स्पष्ट केले. महायुतीचे नेते खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्या भक्कम पाठिंब्यावर मालवण तालुक्यात महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत.

टाइम्स स्पेशल

या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानतो, असे सांगून धोंडी चिंदरकर म्हणाले, आजचा पहिला विजय हा आमच्या यशाची सुरूवात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा म्हणून सिंधुदुर्गातील विजयोत्सवाच्याच सभा ठरणार आहेत, असा विश्वास चिंदरकर यांनी व्यक्त केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, महेंद्र चव्हाण, महेश मांजरेकर, अरूण मेस्त्री, सुमीत सावंत, दया हाटले, भाई घाडीगावकर, शुभम मठकर, संतोष बाईत, विजय निकम, सुभाष लाड, दिपक सुर्वे, राजू परूळेकर, संतोष पाताडे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg