loader
Breaking News
Breaking News
Foto

कठोर परिश्रमातून विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद : उर्मिलाताई घोसाळकर

रत्नागिरी - कलेच्या विश्वात उमटवलेल्या रेषा आणि भूगोलाच्या ज्ञानात मिळवलेले प्राविण्य अशा दुहेरी यशाचा गौरव रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आला. शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंट्री व इंटरमिजिएट) आणि भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा ’गुणगौरव सोहळा’ आज प्रशालेतील ठाकूर सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती उर्मिलाताई घोसाळकर उपस्थित होत्या. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त विनायक हातखंबकर यांनी भूषवले. व्यासपीठावर मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर, श्री.दादा कदम, कलाशिक्षक राहुल कळंबटे, उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पटवर्धन हायस्कूलच्या ८४ आणि बाहेरील शाळेतील तीन विद्यार्थी एकूण ८७ विद्यार्थी चित्रकलेचे व तीन विद्यार्थी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचे असे एकूण ९० विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला यामध्ये हायस्कूलच्या केंद्रावर आठ शाळा परीक्षेसाठी बसतात त्यामध्ये केंद्रावरील तीन शाळेतील विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेले होते त्यांचा सुद्धा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला यामध्ये थॉमस हायस्कूलचा विद्यार्थी श्रेयस जाधव .माने इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी अनन्या मिस्त्री आणि नवनिर्माण हायस्कूल इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी सानवी गवस या राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अर्णव अभिजीत जोशी (इयत्ता ५ वी), रौप्य पदक मिळवणारा अभिनव जीवन देसाई (इयत्ता ७ वी), कांस्य पदकमिळवणारी मृण्मयी श्रीगुरुदास दांडेकर (इयत्ता ५ वी ) या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शासकीय रेखा कला परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत ६७ वा क्रमांक मिळवणार्‍या कुमारी अनिहा सुर्वे या विद्यार्थिनीचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. एलिमेंट्री परीक्षेसाठी यशस्वी ठरलेल्या ४५ विद्यार्थ्यांना तसेच इंटरमिजिएट परीक्षेमध्ये यशस्वी ठरलेल्या ३९ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका उर्मिलाताई घोसाळकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतातून पटवर्धन प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या उत्तम यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी कठोर कष्ट करून हे यश मिळवले त्याबद्दल कौतुगोद्गार काढले. कायमच पटवर्धन हायस्कूलची मुले विविध क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम असे यश संपादन करत असतात. त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

अध्यक्षीय भाषण करताना भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त विनायक हातखंबकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. ते म्हणाले की, कलेची आवड आणि विषयाचे सखोल ज्ञान या गोष्टी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडतात. पटवर्धन हायस्कूलच्या या गुणवंतांनी आपल्या कष्टाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि विद्यार्थिनींच्या सुमधुर स्वागतगीताने झाली. कलाशिक्षिका मुग्धा पाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ पालकर यांनी तर उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर यांनी आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg