दोडामार्ग (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचाराला पाच दिवस शिल्लक राहिले असताना मणेरी जिल्हा परिषद मतदार संघात अपक्ष उमेदवार सुनिता भिसे यांनी जोरदार प्रचारात आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद माजी सदस्य एकनाथ नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. अनेक गावात त्यांना मतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मोठया संख्येने कार्यकर्ते भिसे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.
दिवसरात्र त्या प्रत्येक गावातील मतदार यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन आपली निशाणी मतदार याना समजावून सांगत आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी सुनिता भिसे याना महायुतीकडून उमेदवारी मागितली होती. पण ऐन वेळी ती नाकारण्यात आली. यामुळे निराश झालेल्या एकनाथ नाडकर्णी यांनी कळणे गावच्या माजी सरपंच सुनिता भिसे याना अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. यामुळे महायुती उमेदवार समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मणेरी जिल्हा परिषद मतदार संघातून एकनाथ नाडकर्णी निवडून आले होते. अनेक गावात त्यांनी विकास कामे केली होती. खासदार नारायण राणे यांचे जवळचे कार्यकर्ते होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून सुनिता भिसे यांची शिफारस केली होती. पक्षाचा एबी फार्म घेऊन अर्ज दाखल केला शिवाय अपक्ष देखील दाखल केला होता. पण उमेदवारी दिली नाही. सुनिता भिसे याना निवडून आणणार असा निर्धार करत अपक्ष उमेदवार सुनिता भिसे यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. रविवारी मणेरी गावात जोरदार प्रचार मोहीम राबवून मतदार यांच्या भेटी घेतल्या. मतदार यांचा आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे सुनिता भिसे यांनी सांगितले.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.