loader
Breaking News
Breaking News
Foto

कौंढर काळसूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये शिवप्रेमी संघ विजेता

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील कौंढर काळसुर प्रीमिअर लीग पर्व ४ थे शिंगणसडा मैदान जोयशीवाडी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत सुनिल मुकनाक यांचा शिवप्रेमीसंघ विजेता ठरला. तर संतोष रामाणे यांचा महाकाली वॉरियर्स संघ उपविजेता ठरला.या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे नियोजन कौंढर काळसुर क्रिकेट कमिटीचे पदाधिकारी उत्तम जोयशी, मंदार जोशी, दीप्तेश तांबे, सुनिल मुकनाक, दीपक चाळके, नरेंद्र कदम, समीर जोयशी, अजय जोयशी, अमित जोयशी यांनी केले. मैदान आणि सुंदर अशी खेळपट्टी बनवण्यासाठी गावातील मुलांनी कठोर मेहनत घेतली. स्पर्धेचे उद्घाटन ते समारोप याचे उत्कृष्ट सूत्र संचालन विनेश तांबे यांनी केले. संपूर्ण स्पर्धेमध्ये नागेश मांजरेकर आणि प्रणय बामणे, सुनिल मुकनाक यांनी आपल्या शैलीत सुंदर असे समालोचन केले. गुहागर तालुका मनसे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी तसेच गावातील मान्यवर मंडळी सरपंच सिया गुजर, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष तांबे, तंटामुक्ती अध्यक्ष धनश्री मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन जोयशी, नाना जोयशी, लतिफ लालू, रवी रामाणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश जाधव, सोसायटी चेअरमन यशवंत जोयशी, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष रामदास गिजे त्याचप्रमाणे गावातील वरिष्ठ मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, सुयोग विचारे, स्वप्नील विचारे, सचिन गुजर यांचे विशेष योगदान व सर्व देणगीदारांनी केलेल्या सहकार्यामुळे व कमिटीच्या सुंदर अशा नियोजनामुळे ही स्पर्धा पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg