खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये 'सडक सुरक्षा अभियान 2026' संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जबाबदारी तसेच रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करणे, रस्त्यावर वावरताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक मदत केंद्र, चिपळूणचे इर्शाद खय्युम बेग, पोलीस हवालदार सुरेंद्र सदाशिव कदम, रोट्रॅक्ट क्लब रत्नागिरी झोनचे अध्यक्ष तुषार खताते व रोट्रॅक्ट क्लब खेडचे सेक्रेटरी गौरव पाडाळकर यांचे माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर यांच्या शुभहस्ते पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर इर्शाद खय्युम बेग व सुरेंद्र कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, वाहन चालवताना हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचे महत्त्व, वाहतूक नियमांचे पालन, रस्ते ओलांडताना घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेवर आधारित घोषवाक्ये, भाषणे सादर केली. तसेच “वाहतूक नियम पाळा – सुरक्षित रहा” असा संदेश दिला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याची प्रतिज्ञा घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका विधी भोसले यांनी केले.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.