loader
Breaking News
Breaking News
Foto

सोशल मिडीयावर जास्त गुंतल्याने वास्तविक जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष : पोलिस निरीक्षक सचिन पवार

चौक (अर्जुन कदम) - सोशल मीडियाचे अनेक वाईट परिणाम आहेत. मानसिक आरोग्यावर ताण, व्यसन, अभ्यासात लक्ष न लागणे, झोप कमी होणे, आणि सायबर बुलिंग (ऑनलाइन दादागिरी); यामुळे वास्तविक जीवनातील संबंधांवरही नकारात्मक परिणाम होतो आणि गोपनीयतेचा धोका वाढून वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते, त्याने एखाद्याचे आयुष बरबाद होते, सोशल मिडीयावर जास्त गुंतल्याने वास्तविक जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष होते, असे संबोधन खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केले. सद्या सोशल मीडियावरून अनेक तक्रारी यांच्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावणे, एखाद्याला मानहानीकारक संबोधने, खोटे अकाऊंट ओपन करून बदनामी करणे असे गुन्हे वाढले आहेत. त्यातच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणूका लागल्या असल्याने खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी ग्रुपऍडमिन, वॉट्स ऍप ग्रुप, इंस्टाग्राम, फेसबुक ऍडमिन व गाव पोलीस पाटील यांची बैठक आयोजित केली होती, त्याप्रसंगी ते उदाहरण देऊन मार्गदर्शन करीत होते. मानसिक आणि भावनिक परिणाम, ऑनलाईन जास्त वेळ घालवल्याने प्रत्यक्ष सामाजिक संबंध कमी होतात आणि एकाकीपणाची भावना निर्माण होते. ऑनलाईन नकारात्मक टिप्पण्या किंवा लाइक्स न मिळाल्यास आत्मसन्मान कमी होऊ शकतो. यामुळे आपले वर्तन आणि जीवनशैलीतील बदल होतो. सोशल मीडियावर जास्त गुंतल्याने वास्तविक जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे सुरक्षा आणि सामाजिक धोके निर्माण होतात. चुकीची किंवा भडकाऊ माहिती पसरते, ज्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होतात. यासाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा असे आवाहन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खर्‍या आयुष्यातील लोकांशी प्रत्यक्ष भेटा, पोस्ट करण्यापूर्वी विचार करा आणि माहितीची सत्यता तपासा. सकारात्मक आणि योग्य गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर करा, असे सांगून आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन सोशल मीडिया चांगल्या पद्धतीने वापरा असे आवाहन उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सपोनि. संतोष औटी यांनी केले. यावेळी पत्रकार अर्जुन कदम, गाव पोलीस पाटील, ग्रुप ऍडमिन यांनी आपले विचार व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg