loader
Breaking News
Breaking News
Foto

CSEET प्रवेश परीक्षेमध्ये रोटरी स्कूलचे 100 टक्के निकालासह दैदिप्यमान यश

खेड (प्रतिनिधी) - द इनस्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी जाहीर झाला. या प्रवेश परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमधील इ. 12वी वाणिज्य शाखेच्या 8 विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील पातळीवरील CS एक्झिक्युटिव्ह परीक्षेसाठी पात्र होण्याचा बहुमान व 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कंपनी सेक्रेटरी (CS) कोर्सेसकरिता दरवर्षी CSEET या परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देत असतात. CSEET या प्रथम पातळी परीक्षेकरिता रोटरी स्कूलच्या इ. 12वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या शाळेतील मार्गदर्शक प्राध्यापकांचे मार्गदर्शन, सतत सराव, मेहनत व जिद्द यांच्या बळावर यशश्री खेचून आणली. सदरच्या CSEET या प्रवेश परीक्षेत रोटरी शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. प्रार्थना उमराणीकर, कु. गौरी शेठ, कु. अन्वी कानडे, कु. सिद्धांत राजेशिर्के, कु. ऋग्वेद चिखले, कु. रिया तटकरी, कु. अवधुत खेडेकर व कु. वेदिका शिंदे हे आपल्या पहिल्याच प्रयत्नात पुढील पातळीवरील CS एक्झिक्युटिव्ह परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

टाईम्स स्पेशल

CSEET या प्रवेश परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना रुपाली बोडस, बाळासाहेब राऊत, पारस नलावडे, स्वप्निल पंडित, संतोष पाटील, अक्सा पोफळणकर, श्रद्धा थरवळ, शबाना मुसा, धनुजा धूत, सरिता भारती व लॅब सहाय्यक राम शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी CSEET परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg