loader
Breaking News
Breaking News
Foto

नॅशनल सायन्स ऑलिंपियाड (एन.एस.ओ) परीक्षेत रोटरी स्कूलचे 61 विद्यार्थी चमकले

खेड (प्रतिनिधी) - विज्ञान ऑलिंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल सायन्स ऑलिंपियाड (एन.एस.ओ) प्रथम पातळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमधील 59 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, 2 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यपदक प्राप्त केले आहे, तसेच शाळेतील 43 विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित दरवर्षी नॅशनल सायन्स ऑलिंपियाड (एन.एस.ओ) परीक्षा ही आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ठ होतात. रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ठ होऊन अभ्यास, जिदद् व चिकाटीच्या बळावर अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नॅशनल सायन्स ऑलिंपियाड (एन.एस.ओ) परीक्षेतील अर्णव घुमरे व अवनिश जगताप या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यपदक प्राप्त केले आहे. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता 1 लीतील खदीजा सुर्वे, अन्वय भोई, भृगू मोरे. इयत्ता 2 रीतील कार्वी शिंदे, संस्कृती कदम, वेदिता देवाडिगा. इयत्ता 3 रीतील वेद जंगम, शिवांश केकाण, रफान रावल. इयत्ता 4 थीतील ओम आंब्रे, शिव गवस, आर्या दिवेकर, अर्णा गांधी. इयत्ता 5 वीतील आहाना बुटाला, वैभव, नैतिका नायर, कविश केकाणे, अर्णव कोकाटे. इयत्ता 6 वीतील अन्विका गोंडकर, पूर्वी सूर्यवंशी, अशर चौगुले, श्लोक दळवी, अर्णव घुमरे, अथर्व हलगवार, श्रवण कासार, हर्ष पवार. इयत्ता 7 वीतील हेरंब लोंढे, रुहाब रावल, वीर कालेकर, सार्थक मोरे. इयत्ता 8 वीतील हर्षल आरेकर, सई कदम, काव्या कांबळे, शेरॉन मुक्कू, प्रिशा शिगवण, सुमित भोसले, प्रणव देवकाते, प्रणव गांगर्डे, शौर्य गवस, अद्वेत मळणगावकर, आयुष मळेकर, अर्णव परकाळे. इयत्ता 9 वीतील कोमल कासार, रेवा शहाणे, शौर्य चाळके, मिहीर शिंदे, स्मित तांबे, इयत्ता 10 वीतील स्वरा पवार, रुद्र हेळगावकर, अवनिश जगताप, वेद कालेकर, अनिश मणकापुरे, हादी मुकादम, श्राव्या निकम, ओम सुर्वे, अथर्व टिकेकर, शिवप्रसाद वाघ, ईशान चितळे, वेद गायकर, सार्थक घडशी. इयत्ता 11 वीतील आस्था जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टाइम्स स्पेशल

वरील विद्यार्थ्यांपैकी शिवांश केकाण, शिव गवस, आर्या दिवेकर, कविश केकाणे, अन्विका गोंडकर, पूर्वी सूर्यवंशी, श्रीहर्ष आग्रे, अशर चौगुले, श्लोक दळवी, विराज गावडे, अर्णव घुमरे, अथर्व हलगवार, श्रवण कासार, हर्ष पवार, आरव सुर्वे. इयत्ता हेरंब लोंढे, रुहाब रावल, शर्वरी सावर्डेकर, वीर कालेकर, सार्थक मोरे, अथर्व नक्षे. हर्षल आरेकर, सई कदम, काव्या कांबळे, शेरॉन मुक्कू, प्रिशा शिगवण, सुमित भोसले, युवराज देवघरकर, प्रणव देवकाते, प्रणव गांगर्डे, शौर्य गवस, अद्वत मळणगावकर, आयुष मळेकर, अर्णव परकाळे, मयंक साळुंखे, कोमल कासार, रेवा शहाणे, रुद्र हेळगावकर, अवनिश जगताप, वेद कालेकर, अनिश मणकापुरे, हादी मुकादम, श्राव्या निकम या सर्व विद्यार्थ्यांची नॅशनल सायन्स ऑलिंपियाड (एन.एस.ओ) द्वितीय पातळी परीक्षेसाठी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व विज्ञान विषय शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वितांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

43 विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg