loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये महायुतीत रा.कॉ. आणि भाजपचे बंड

खेड - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीत भाजपने बंडाचे निशाण फडकावले आहे. जिल्हा परिषदेसाठी २ तर पंचायत समितीसाठी १२ जागांवर उमेदवार उभे करत शिवसेनेसमोर आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादीही स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरली असल्याने चुरस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेली. नगराध्यक्षपदासह शिवसेनेला १७ तर भाजपला ३ जागा पदरात पडल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेना-भाजप महायुती म्हणून लढतील अशी बांधण्यात आलेली अटकळ फोल ठरली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेने भाजपला बाजूला ठेवले. युती तुटल्यामुळे कोंडीत सापडलेल्या भाजपने -शिवसेनेला शह देण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण भागात भाजपचे फारसे प्राबल्य नाही. वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपला बळ मिळाले आहे. याच बळावर भाजपने जि.प. साठी २ तर गणात १२ उमेदवार उभे केले आहेत. सुकिवली गटातून भाजपच्या दिव्या होळकर तर लोटे गटातून मनाली कांबळी यांनी अर्ज दाखल केले आहे. पंचायत समितीसाठी गुणदे गणातून संजय आखाडे, भरणेतून नीलेश बामणे, सुकिवलीतून दिव्या होळकर, तिसंगीतून भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषीकेश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. खवटी गणातून बोरघरच्या सरपंच ज्योती बोरकर, भरणे गणातून विजय दरेकर, लोटे गणातून अविनाश आंब्रे, संजय आंब्रे, आंबडस गणातून मेघना मोरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजप पाठोपाठ अजित पवार राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरली आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चुरस आणखीनच वाढणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी कोणकोण अर्ज मागे घेणार यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg