loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय काँग्रेसचे कसबा पंचायत समितीचे उमेदवार बापु सुर्वे यांची प्रचारात आघाडी

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कसबा पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत असलेले उमेदवार संजय उर्फ बापु सुर्वे यांनी प्रचारात आघाडी घेतली असुन त्यांनी वैयक्तिक गाठी भेटीवर जोर दिला आहे. या गटातून शिवसेना (शिंदे गट) उमेदवार सुरेश माईन, सेना ठाकरे गटाचे चंद्रकांत फणसे, तर काँग्रेसकडून बापु सुर्वे आणि एक अपक्ष अशी लढत होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काँग्रेस उमेदवार बापु सुर्वे वाडी-वस्तीवर जाऊन गाठी-भेटी वर जोर देत असुन काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचे काम करीत आहेत. एकीकडे प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असणारे दोन मातब्बर तर दुसरीकडे राजेंद्र महाडिक यांच्या तालमीत तयार झालेले आणि गावचे सरपंच पद भूषविलेले, प्रशासनावर छाप असलेले शिंदे सेनेचे उमेदवार सुरेश माईन या अटी-तटीच्या लढतीत तीन-तीन सरपंच पद भूषविलेले उमेदवार एकाच पंचायत समिती गणातून मैदानात उत्तरल्याने या त्रीशंकु लढतीत विजयश्री कोणाच्या गळ्यात पडते, हे आता पाहावे लागणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg