loader
Breaking News
Breaking News
Foto

स्व. बाळासाहेब ठाकरे यांना कोकणात अनोखी आदरांजली; मॉडेल विमानांच्या प्रात्यक्षिकाचा ३८०० विद्यार्थ्यांनी घेतला आनंद

खेड (दिलीप देवळेकर) - शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या आरंभानिमित्त राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. लायन्स क्लब खेड आणि शिवचैतन्य पतसंस्था यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात मॉडेल विमानांच्या साहाय्याने आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला खेड तालुक्यातील विविध शाळांमधील तब्बल ३८०० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. प्रारंभी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सदानंद काळे आणि अथर्व काळे यांनी विद्यार्थ्यांना मॉडेल विमानांविषयी सविस्तर माहिती दिली.

टाइम्स स्पेशल

यानंतर आकाशात झेपावणाऱ्या मॉडेल विमानांनी विविध हवाई कसरती सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उंच भरारी, अचूक वळणं आणि आकाशातून करण्यात आलेली पुष्पवृष्टी पाहून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांची ओळख करून देणारा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आणि कार्याला सृजनशील उपक्रमातून मानवंदना देण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. लायन्स क्लब खेड आणि शिवचैतन्य पतसंस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg