loader
Breaking News
Breaking News
Foto

कोळपे जि.प.गटात भाजपचे अधिकृत उमेदवार प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) - कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठाचे उमेदवार जितेंद्र तळेकर हे भाजपाच्या गळाला लागले आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे उबाठा गटाला वैभववाडी तालुक्यात मोठा धक्का बसला त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड होताच भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मतदारसंघात उबाठाच्या सुनिल नारकर यांचा अर्ज छानणीत बाद झाला होता. तर दुसरे उमेदवार जितेंद्र तळेकर यांनी अर्ज मागे घेतला. त्याचप्रमाणे भाजपाच्या डमी उमेदवार राजेंद्र राणे, अनंत फोंडके, अतुल सरवटे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे एकमेव उमेदवार असलेले प्रमोद रावराणे बिनविरोध झाले आहेत. या अगोदर कोकिसरे पंचायत समितीच्या भाजपाच्या उमेदवार साधना नकाशे बिनविरोध ठरल्या आहेत. त्यामुळे उबाठा सेनेला धाक्यावर धक्के बसत आहेत. तर भाजपाचा विजयाचा वारू सुसाट सुटला असून भाजपा कार्यकर्ते जल्लोष करीत असून उबाठा सेनेत सन्नाटा पसरला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg