loader
Breaking News
Breaking News
Foto

​अजित पवार यांच्या निधनाने राजकारणात मोठी पोकळी; आमदार दीपक केसरकर यांनी वाहिली श्रद्धांजली

सावंतवाडी (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ​अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना केसरकर म्हणाले की, अजितदादा हे एक स्पष्टवक्ता आणि उत्तम प्रशासक होते. बोलण्यात कटूता असली तरी मनातून ते अत्यंत प्रेमळ होते. पहाटे कामाला सुरुवात करून जनतेची कामे मार्गी लावणारा तो लोकनेता होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना केसरकर पुढे म्हणाले की, "मी राष्ट्रवादीत असताना आमचे अतिशय निकटचे संबंध होते. राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, तेव्हा दादांना मुख्यमंत्री करावे म्हणून शरद पवार यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात मी होतो. मी पक्षात राहावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही." ​राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दादांच्या असलेल्या कटाक्षाचे कौतुक करताना केसरकर म्हणाले की, "ते अर्थमंत्री असताना त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी दिली होती. कठोर निर्णय घेताना ते मागे-पुढे पाहत नसत." तसेच, आसाम मधुन मी पक्षाची भूमिका मांडत होतो तेव्हा राजकीय घडामोडींच्या वेळीही दादांनी 'हा आम्ही घडवलेला कार्यकर्ता आहे' असे म्हणत कौतुक केले होते, अशी आठवणही केसरकर यांनी यावेळी सांगितली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg