ठाणे (प्रतिनिधी) : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याचे ठाण्यात कनेक्शन समोर आले आहे. ठाणे महापालिकेत वादग्रस्त असलेले तत्त्कालीन सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याविरोधात त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचारीने लैंगिक अत्याचाराची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी महेश आहेर संबंधित महिलेला भोंदू अशोक खरात याच्या कार्यालयातही घेऊन गेला होता अशी तक्रार केली आहे. याप्रकारामुळे अहेर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे महापालिकेतून महेश आहेर हे निवृत्त झाले आहेत. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ मारहाण केली होती. आव्हाड यांच्या मुलीविरोधात अपशब्द काढल्याचा आरोप आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता.
मारहाणीनंतर आहेर यांनी याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला होता. आहेर यांच्या विरोधात पुन्हा एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी यांने सन २०२० ते सन २०२३ चे दरम्यान ठाणे महानगरपालीका, पाचपखाडी ठाणे येथे फिर्यादी पीडित हया डाटाइंट्री ऑपरेटर (असिस्टंट) म्हणून नोकरी करीत असतांना महेश भाऊराव आहेर तत्कालीन सहाय्यक आयुक्त, ठाणे महानगरपालीका, पाचपखाडी, ठाणे यांनी त्यांचा पदाचा गैरफायदा घेऊन त्यांचे हिरानंदानी इस्टेट रिव्हेरा बिल्डींग येथे भाडयाचे पॅलटवर फिर्यादी यांना घेवून जावून फिर्यादी यांना कोल्ड्रींक मधून गुंगीकारक पदार्थ देवून त्यांचेशी त्यांचे इच्छेविरूध्द जबरदस्तीने शरिरीक संबंध करून महेश आहेर यांनी त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून ते युट्यूबवर व्हायरल करण्याची धमकी देवून फिर्यादी यांना वारंवार शरिरसुखाची मागणी केली.
दादा पाटील वाडी, नौपाडा, ठाणे येथील भाडयाचे रूममध्ये जबरदस्तीने शाररीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच महेश आहेर यांनी फिर्यादी यांना नाशिकमध्ये एक प्रसिध्द कॅप्टन अशोक खरात हे ज्योतीषी आहेत आपण आपल्या भविष्याबद्दल त्यांचेकडे जावुन जाणुन घेवु, असे सांगुन त्यांचेवर कॅप्टन खरात यांच्या नाशिक येथील ओकस या कार्यालयामध्ये जावुन फिर्यादी यांचे इच्छेविरूध्द महेश आहेर यांनी त्यांचेवर लिंबु उतरविला व त्यांना मोती खडा गळयात परिधान करण्यासाठी दिला आहे, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.