loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरचा विकास मिच करणार, ना. सामंत

शृंगारतळी- जिल्ह्यात रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या ५६ पेक्षा ५० जागा निवडून येतील आणि जिल्हापरिषद, पंचायत समितीवर शिवसेना भाजप महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी (चिखली) ओमकार मंगल कार्यालय येथे झालेल्या उमेदवारांच्या प्रचारसभेला मार्गदर्शन करताना सामंत बोलत होते. यावेळी माजी आ. डाँ. विनय नातू, भाजप जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे,गुहागरच्या नगराध्यक्षा निता मालप, माजी नगराध्यक्षा राजेश बेंडल, भाजप तालुका अध्यक्ष अभय भाटकर, शिवसेना तालुका प्रमुख दीपक कनगुटकर तसेच पाचही जिल्ह्यापरिषद गटातील व पंचायत समितीच्या १० गणातील उमेदवार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालकमंत्री सामंत म्हणाले की, गुहागर तालुक्यातील बहुसंख्य सरपंच माझ्याकडे विकासकामांसाठी येत असतात. यावरुन गुहागर तालुक्याचा विकास नक्की झालेला आहे की नाही, अशी मला शंका वाटते. मात्र, येथील जनतेने विकास निधीबाबत चिंता करु नये, आपण कामात कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द दिला. गुहागर तालुक्यातील आरजीपीपीएल प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करणे व निरामय रुग्णालय सुरु करण्याबाबत मी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. देवखेळ या वेबसीरीजविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले, विरोधक विकासावर बोलत नाहीत. कुठेतरी समाजाचे राजकारण करण्याचे त्यांचे उद्योग सुरु आहेत. देवखेळ या वेबसीरिजवर आपल्या संस्कृतीला बाधा करणारे काही असेल तर ते थांबविले जाईल, असा मी मतदारांना आज विश्वास देतो, असेही स्पष्टीकरण पालकमंत्र्यांनी दिले. ही संस्कृती जपण्याची जबाबदारी पालमंत्री म्हणून माझ्यावर सोडून द्या, कारण हे देवखेळे व नमन या संस्कृतीचा सर्वाधिक चाहता मी आहे. मी एक राज्यकर्ता म्हणून चांगला मृदुंग वादक आहे. नमनातला पण वाजवू शकतो आणि राजकारणातला पण वाजवू शकतो, असेही विनोदी शैलीत पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg