loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना, धनुष्यबाण कोणाचा? उद्यापासून 'सर्वोच्च' सुनावणी; 2 दिवस होणार युक्तिवाद

मुंबई: शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून अंतिम सुनावणीला सुरुवात होत आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सलग दोन दिवस दोन्ही गटांचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेतला जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने 2023 मध्ये एकनाथ शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने याआधीच स्पष्ट केले आहे की, इतर प्रकरणांप्रमाणे हे प्रकरण केवळ तारखांवर प्रलंबित ठेवले जाणार नाही, तर अंतिम युक्तिवादानंतर निर्णयाकडे जाण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याच्या लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचा युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे. तसेच पक्षाची स्थापना, संघटनात्मक रचना, बहुमताचा मुद्दा आणि आमदार-खासदारांच्या पाठिंब्याऐवजी मूळ पक्षघटना व पक्षाची ओळख महत्त्वाची असल्याचे मुद्दे मांडले जाणार आहेत. तर दुसरीकडे, शिंदे गटाकडून बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा, संघटनात्मक नियंत्रण आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांचा मुद्दा पुढे केला जाणार आहे. आयोगाने दिलेला निर्णय कायदेशीर चौकटीत असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून होणार असल्याची माहिती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg