loader
Breaking News
Breaking News
Foto

कोल्हापूर विभागस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा संघ विजयी

बांदा (प्रतिनिधी) - क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत म्हसवड-सातारा येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटात खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदाच्या संघाने कोल्हापूर विभागस्तरावर विजेतेपद मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. या संघात अथर्व केसरकर, परशुराम गावडे, आर्यन गावकर, अर्जुन पाटील, गुरुप्रसाद धारगळकर, लवू नाईक, रुपेश देसाई, यशवंत बांदेकर, मंथन गावडे, आर्यन जाधव, आयुष वालवलकर, अनंत सावंत, ओंकार झाट्ये या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला क्रीडा शिक्षिका सुमेधा सावळ आणि सुनील परब यांचे मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा संघ दिनांक १६ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या कोल्हापूर विभागीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सुनील परब यांच्या सोबत म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा येथे रवाना झाला होता. काही दिवसांपूर्वी या संघाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. तेथेही हा संघ उत्कृष्ट कामगिरी बजावत कोल्हापूर विभागांतर्गत विजयी चषकाचा मानकरी ठरला असून राज्य स्तरावर प्रवेश करता झाला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबाबत खेमराजचे प्राचार्य प्रदीप देसाई यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच पालक आणि माजी विद्यार्थी यांच्याकडून या खेळाडूंचे कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg