loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतून निघाली शिर्डी साई यात्रा; भक्तीमय वातावरणात उत्साहाचे दर्शन

दापोली- तालुक्यामधून प्रत्येक वर्षी ०२फेब्रुवारी या दिवशी शिर्डी कडे जाण्यासाठी साई भक्त निघतात. सुरुवातीला काही निवडक साई भक्ताच्या बरोबर हा प्रवास सुरू झाला होता परंतु आता शेकडो साईभक्त या पायी दिंडीमध्ये सहभागी होत आहेत प्रत्येक वर्षी हे साईभक्त वाढत आहेत. श्री साईबाबांच्या पावन दर्शनासाठी शिर्डीकडे निघालेली साई यात्रा भक्ती, आनंद आणि उत्साहात सुरू असून संपूर्ण परिसर “साई राम”च्या जयघोषाने साईमय झाला आहे. यात्रेत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत असून दापोली आज श्रद्धेच्या रंगात रंगला आहे. या यात्रेत महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. फुलांची आकर्षक सजावट, भगवे ध्वज, साईबाबांच्या प्रतिमा आणि भक्तिगीतांच्या तालावर निघालेल्या या यात्रेमुळे दापोली शहरात भक्तीमय व प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाहतूक सुरळीत राहावी व भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असून यात्रा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पुढे जात आहे. यात्रेच्या प्रारंभी साईबाबांची विधिवत आरती व पूजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य व समाजात शांतता नांदावी यासाठी साईबाबांकडे प्रार्थना केली. स्थानिक साईभक्त मंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही साई यात्रा भक्तीभावाने सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg