loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवई जि.प. गटात महायुतीच्या विनोद म्हस्के यांची प्रचारात आघाडी

संगमेश्वर -कडवई जिल्हा परिषद गटात होत असलेल्या निवडणूक प्रचारात महायुतीला मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली, तसेच प्रशांत यादव, सूर्यकांत साळुंखे, राजेंद्र महाडिक, राजन कापडी, अमित ताठरे, राजेंद्र सुर्वे, दिलीप सावंत व वसंत उजगावकर यांच्या मार्गदर्शना खाली महायुतीने प्रचाराचा एल्गार पुकारला आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या उमेदवारांनी या गटात प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. बहुतांश ठिकाणी महायुतीने निर्णायक आघाडी घेतली असून, या गटात महायुती व ठाकरे गट यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. मात्र महायुतीने संपूर्ण ताकदीनिशी प्रचार करत मतदारांवर प्रभाव टाकण्यात यश मिळवले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कडवई जिल्हा परिषद गटात पहिल्यांदाच तरुण व सुसंस्कृत उमेदवार विनोद म्हस्के यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यशैलीला व विचारांना मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, महायुती विजयी दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. या गटात महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केल्याचेही दिसून येत आहे. या परिसरात एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण असल्याने पंचायत समिती गणांमध्येही महायुतीला चांगला पाठिंबा मिळत आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुती प्रचारात यशाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg