loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे एमआयडीसीत खळबळ.... पिण्याच्या पाण्यातून केमिकल मिश्रित पाण्याचा पुरवठा, १० जण रुग्णालयात

खेड - "रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील सुप्रिया लाईफ सायन्सेस या कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाणी चक्क एमआयडीसीच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळल्याने संपूर्ण लोटे परिसरात खळबळ उडाली आहे." "आज सकाळी घराघरातील नळांमधून हे रासायनिक पाणी आल्याने ते पाणी वापरणाऱ्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना बाधा झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे ८ ते १० जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने लोटे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे." "एमआयडीसी प्रशासनाच्या आणि संबंधित कंपनीच्या या गंभीर निष्काळजीपणामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिसरात सध्या तीव्र संतापाची लाट आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे."

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg