loader
Breaking News
Breaking News
Foto

माजगाव येथे सरपंच पदाच्या उमेदवार रंजना कानसे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

सावंतवाडी : माजगावच्या महायुतीतील थेट सरपंच पदाच्या उमेदवार रंजना कानसे यांनी माजगाव येथील महादेव आणि श्री सातेरी मंदिरात श्रीफळ (नारळ) ठेवून प्रचाराचा शानदार शुभारंभ केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी मंडळ अध्यक्ष मधू देसाई, भाजपा सरचिटणीस महेश धुरी, सरपंच रिची डिमेलो, अशोक दळवी, माजी सरपंच हरमलकर, आर. के. सावंत, संजय कानसे, सुरेश सावंत, तातू सावंत, विष्णू वेजरे, रामदास भोगण, विशाल लाड, रेडकर, संजय माजगावकर आदी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg