लांजा (संजय साळवी) - ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो हि भावना प्रत्येक मराठा समाज बांधवांनी जोपासली तरच समाजासाठी आपण काही तरी करू शकतो. लांजा तालुका मराठा संघाने लांजा येथे मराठा भवन उभे करण्याचा जो संकल्प सोडला आहे तो या भावनेतूनच पूर्णत्वास जाणार आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तिंनी पुढे येवून सढळ हस्ते मदत केली पाहिजे. या मराठा भवनसाठी समाजातील प्रत्येक समाज बांधवाने वाहून घेवून काम केले तर लवकरच लांजा येथे सर्वसोयींनीयुक्त सुसज्ज असे मराठा भवन उभे राहिल असा ठाम विश्वास लांजा - संगमेश्वरचे माजी आमदार आणि मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुभाष बने यांनी भांडूप मुंबई येथे बोलताना व्यक्त केला. लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने मुंबई भांडुप येथील पराग विद्यालयाच्या सभागृहात मुंबईस्थित लांजा तालुका मराठा स्नेहमेळावा रविवार २२ मार्च रोजी संपन्न झाला. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुभाष बने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, कार्याध्यक्ष सुनील कुरूप, सरचिटणीस विजय पाटोळे, उपाध्यक्ष शरद चव्हाण, अविनाश (राजू) जाधव, समीर सावंत, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव, सहचिटणीस प्रजाप माने, सदस्य संजय साळवी, ऍड. लीना जेधे, स्वप्ना सावंत, सल्लागार एकनाथ सावंत, नंदकुमार पाटोळे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करून करण्यात आली. यावेळी सुनील कदम, नंदकिशोर खानविलकर, सुबोध सरफरे, राजन देसाई, सुभाष लाड, विलास माने या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर नुकतेच निधन पावलेले संघाचे धडाडीचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य स्व. सतीश राणे तसेच गेले वर्षभरात निधन पावलेल्या समाजातील ज्ञात - अज्ञात समाजबांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मुंबईस्थित समाज बांधव विलास माने, राजन देसाई, सुनील कदम, प्रसाद पाटोळे, सुबोध सरफरे, सुभाष लाड, नंदकिशोर खानविलकर आदिंची मार्गदर्शनपर मनोगते झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी आमदार सुभाष बने यांनी आपल्या भांडुप मुंबई येथील पराग विद्यालयातील सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने अध्यक्ष सुभाष राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार करण्यात आला.
याशिवाय तालुक्यातील कुरचुंब गावचे सुपुत्र व मुंबईस्थित मराठा समाजबांधव नारायण (नाना) माने यांनी या स्नेहमेळाव्याची संपूर्ण व्यवस्था उत्तम राखल्याबद्दल त्यांचा देखील संघाचे कार्याध्यक्ष सुनील कुरुप यांच्या हस्ते यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर, समाज बांधव यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस विजय पाटोळे यांनी केले. या प्रास्ताविकामध्ये त्यांनी संस्थेच्या आजवरच्या ४२ वर्षांच्या कामकाजाचा व संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा विस्तृत आलेख सभागृहासमोर मांडला. त्यानंतर उपाध्यक्ष शरद चव्हाण यांनी या मेळाव्याचा मुख्य उददे्श स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहचिटणीस प्रजाप माने यांनी केले. या मेळाव्याला लांजा तालुक्यातील बहुसंख्य गावातील मराठा समाजातील मान्यवर तसेच समाज कार्याची आवड असणारे मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.