loader
Breaking News
Breaking News
Foto

" मी स्वतःहून राज्यमंत्रिपद स्वीकारलं " - राज्यमंत्री योगेश कदम

दापोली (वार्ताहर) - मी हट्ट धरला असता तर मला कॅबिनेट मंत्रिपदही मिळालं असतं; मात्र त्या पदावर एकच खातं मिळण्याची शक्यता होती आणि कोणतं खातं मिळेल, याची खात्री नव्हती. त्यामुळे मी स्वतःहून राज्यमंत्रिपद स्वीकारलं,” असे स्पष्ट वक्तव्य राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले. दापोली येथे एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी प्रथमच आपल्या मंत्रिपदाबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “राज्यमंत्रिपदाच्या माध्यमातून कोकणासाठी अधिक काम करता येईल, अशी माझी भावना होती. त्यामुळेच मी हे पद स्वीकारले.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

“सुमारे ५० वर्षांनंतर दापोली तालुक्याला मंत्रिपद मिळालं आहे. हा मोठा कालावधी असून, ही उणीव काही पाच वर्षांत भरून निघणार नाही. त्यासाठी विविध योजना राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” मंत्री म्हणून काम करताना आपली प्राधान्यक्रमाची सूत्रे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “माझ्या डोळ्यासमोर प्रथम दापोली मतदारसंघ, त्यानंतर कोकण आणि मग महाराष्ट्र असा क्रम आहे. तसेच योग्य व्यक्तीला योग्य संधी मिळावी, यासाठीही मी प्रयत्नशील आहे.” या विधानामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, त्यांच्या भूमिकेची विविध स्तरांतून चर्चा होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg