loader
Breaking News
Breaking News
Foto

रामनवमी निमित्त देवघर येथे साई भंडाऱ्याचे आयोजन, भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन

म्हसळा - रायगड : रामनवमीच्या निमित्ताने म्हसळा तालुक्यातील देवघर येथे श्री साईनाथ सेवा ट्रस्टच्या वतीने गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी भव्य साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमात परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता काकड आरतीने होणार असून दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता मध्यान्ह आरती पार पडेल. दुपारी १ ते ४ या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भंडाऱ्यासाठी भाविकांकडून स्वेच्छेने धान्य तसेच देणगी स्वरूपातील योगदान स्वीकारण्यात येणार आहे. इच्छुकांनी साई मंदिर, देवघर, ता.म्हसळा, जि.रायगड येथे संपर्क साधावा, असे श्री साईनाथ सेवा ट्रस्ट वतीने कळविण्यात आले आहे. धार्मिक व सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg