loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

दापोली (वार्ताहर) - दापोली तालुक्यातील केळशी येथे सतीची भाट ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायण पूजेच्या औचित्याने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित संघांनी सहभाग नोंदवत क्रीडानगरीत रंगत आणली. अंतिम फेरीत गजानन संघर्ष संघ यांनी उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. काळकाई कला क्रीडा मंडळ (खेड) संघाने द्वितीय, श्रीकृष्ण भडगाव (खेड) संघाने तृतीय, तर जय भवानी (देवधे, लांजा) संघाने चतुर्थ स्थान मिळवले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चढाईचा मान सिद्धेश गौरत याने मिळवला, तर उत्कृष्ट पकडीचा किताब पिंट्या आंबेकर याला प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निवासजी पाटील यांनी भूषविले. उद्घाटन पंचायत समिती सदस्य संदीप चिखले यांच्या हस्ते करण्यात आले, तर पारितोषिक वितरण जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. वाडीचे अध्यक्ष शंकर पाटेकर, संतोष पाटील यांच्यासह ग्रामस्थ, महिला भगिनी, मुंबई मंडळाचे सदस्य आणि प्रायोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नरेश पवार, काका श्रीवर्धनकर, अरविंद जाधव, रचित पटेल, प्रसाद पाटेकर, महेंद्र कदम, विरेंद्र पवार, राजेश भिसे, प्रसाद जाधव, भरत राऊत, योगेश भुवड, दत्ताराम गौरथ, अभिजित माने, सुनील रेवाळे, सुहास रेवाळे, सचिन पाटेकर, निलेश पवार, सुशांत पवार, रुपेश पवार, बंटी पाटील, उमेश पाटील, विकास मोहिते, मधुकर मोहिते, चेतन जोशी, राजेश कदम, जितेंद्र पवार, मंदार पुशीलकर, संजय गौरथ, नरेश भिसे, संजय श्रीवर्धनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

स्पर्धेदरम्यान चुरशीचे सामने पाहायला मिळाले असून, ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला चालना देणारा हा उपक्रम ठरला. सतीची भाट ग्रामस्थ मंडळाच्या या उपक्रमामुळे धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg