loader
Breaking News
Breaking News
Foto

​शेअर मार्केट घोटाळा: सावंतवाडीत ‘ठाणे क्राईम ब्रँच’ची मोठी कारवाई; मुख्य संशयिताच्या बंगल्याचा पंचनामा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - कोट्यवधी रुपयांच्या शेअर ट्रेडिंग मार्केट घोटाळ्याच्या प्रकरणाने मंगळवारी मोठे वळण घेतले. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर याच्या सावंतवाडी येथील आलिशान बंगल्याचा पंचनामा करण्यासाठी ठाणे क्राईम ब्रँचचे विशेष पथक शहरात दाखल झाले. या धडक कारवाईमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषतः सावंतवाडी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात आहे. ठाण्यातील सचिन राणे, प्रिती राणे आणि सावंतवाडीतील सागर कारिवडेकर या तिघांना या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मानले जात आहे. त्यांच्यातील कथित 'ठाणे ते सावंतवाडी' कनेक्शन समोर आल्यानंतर तपासाला वेग आला असून, या साखळीचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलीस पथक सावंतवाडीत पोहोचले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घोटाळ्याचा मुख्य गुन्हा ठाणे येथे दाखल आहे. त्यामुळे ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्यांच्या पथकाने आज ही कारवाई केली. या पथकाला स्थानिक सावंतवाडी पोलीस टीमने तपासात सहकार्य केले. तपास पथकाने कारिवडेकर याच्या बंगल्याची कसून झडती घेत मालमत्तेचा पंचनामा केला आहे. या कारवाईमुळे या घोटाळ्याचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचले आहेत, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. पोलीस या प्रकरणात आणखी काही पुरावे गोळा करण्याची शक्यता असून आगामी काळात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg