loader
Breaking News
Breaking News
Foto

कुवे आणि पुरागाव ही गावे वगळावीत या मागणीसाठी कुवे ग्रामस्थांची लांजा नगरपंचायतीवर धडक

लांजा (संजय साळवी) - लांजा नगरपंचायत हद्दीतून कुवे आणि पुरागाव ही गावे वगळावीत या मागणीसाठी आज सोमवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी कुवे ग्रामस्थांनी लांजा नगरपंचायतीवर धडक दिली. यावेळी गावकऱ्यांच्यावतीने मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांना निवेदन सादर करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात कुवे ग्रामस्थांनी म्हटले आहे की, लांजा नगरपंचायतीत सामील झाल्यापासून लांजातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या जास्त असून कुवे गावच्या लोकप्रतिनिधींची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक निर्णय लांजा शहराला डोळ्यासमोर ठेवून होत आहेत व त्यामुळे कुवे गावच्या फायद्याचे नसतानाही आम्हाला ते स्वीकारावे लागत आहेत.‌ घरपट्टी, मालमत्ता कर, खेळकर, स्वच्छता, पथदीप कर किंवा आणखी काही नवीन कर लादले जात आहेत किंवा आहे त्या दरामध्ये चौपट वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे घर किंवा अन्य काहीही प्रकारचे बांधकाम करत असताना नगरपंचायतीच्या नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय बांधकाम करता येत नाही. त्यामुळे नवीन बांधकाम करणे आम्हाला अवघड झाले आहे. तोच प्रकार घर दुरुस्तीच्या बाबतीतही होत आहे.‌ नगरपंचायतीच्या विकास आराखड्यात मैदान, बागा, शैक्षणिक व अन्य काही कामांसाठी नियमाप्रमाणे लांजापेक्षा अधिक भूखंड हे कुवे गावात आरक्षित करून व गावच्या माथ्यावर मारून आमच्या जमिनी अडकवून ठेवल्या जात आहेत. नगरपंचायतीमुळे येणारा नियोजित वाटा हा लांजा शहराला जास्त आणि कुवेला कमी प्रमाणात येत आहे. खर्च करताना, निर्णय करताना कुवे गावचा विचार केला जात नाही. कुवे गावातील ८० टक्के लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे.‌ मात्र नगर पंचायतीत सहभागी झाल्यापासुन रोजगार हमीच्या शंभर टक्के अनुदानाच्या योजनांपासून मागील १४ वर्षापासून गावाला वंचित राहावे लागत आहे.‌ परिणामी, आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कुवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रापेक्षा सध्याचे नगरपंचायत कार्यक्षेत्र गावापासून पाच कि.मी. लांब अंतरावर आहे. त्यामुळे जन्ममृत्यु नोंदणीच्या कामासाठी लांजा येथे येणे जाणे आर्थिक आणि वेळेच्या बाबतीत सर्वांगीण गैरसोयीचे ठरत आहे. या सर्व एकूण बाबी लक्षात घेता कुवे व पुरागावाला नगरपंचायतीमधून वगळण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन देखील छेडले जाईल असा इशारा देखील ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, याबाबत बोलताना लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी दोन्ही बाजूंच्या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील योग्य तो निर्णय घेतला जाईल असे ठोस आश्वासन कुवे व पुरागाव ग्रामस्थांना दिले आहे. दरम्यान, याबाबतचे निवेदन लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार तसेच नगराध्यक्ष सावली कुरूप यांना सादर करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर व अन्य नगरसेवक उपस्थित होते.‌ यावेळी मोठ्या प्रमाणात कुवे ग्रामस्थ उपस्थित होते.‌

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg