loader
Breaking News
Breaking News
Foto

पाचल ग्रामपंचायत हद्दीतील बाजारवाडीत विहिरीत बैल पडून मृत्यू; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

पाचल : तुषार पाचलकर (राजापूर) पाचल ग्रामपंचायत हद्दीतील बाजारवाडी परिसरात चार दिवसांपूर्वी एका विहिरीत बैल पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्यानंतर ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला. विहिरीत काहीतरी मृत अवस्थेत असल्याची खात्री झाल्यानंतर पाहणी केली असता अज्ञात बैल मृत अवस्थेत आढळून आला.या घटनेची तात्काळ दखल घेत पाचल ग्रामपंचायतीचे सरपंच बाबालाल फरास,सदस्य विनायक सक्रे, ग्रामविकास अधिकारी के. वाय. पाटील आणि मुख्य लिपिक कल्पेश सुतार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बैलाचा मृत्यू होऊन अनेक दिवस झाले असल्याने तो सडलेल्या अवस्थेत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गाव पातळीवरच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरपंच बाबालाल फरास, ग्रामपंचायत अधिकारी कांबळे, मुख्य लिपिक कल्पेश सुतार तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी प्रयत्न केले. मात्र बैल पूर्णपणे सडलेला असल्याने विहिरीतून बाहेर काढताना मोठ्या अडचणी येत होत्या. परिसरातील दुर्गंधी कमी व्हावी व आरोग्याचा धोका टाळावा, यासाठी पाचल ग्रामपंचायतीने तातडीची उपाययोजना करत विहिरीत जंतुनाशक म्हणून ब्लिचिंग पावडर तसेच विघटन प्रक्रियेसाठी सिंगल सुपर फॉस्फेट पावडर टाकली. यामुळे दुर्गंधी नियंत्रणात आणण्याचा व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg