loader
Breaking News
Breaking News
Foto

विर्डी गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी माजी उपसभापती यांचे गावात रस्ता कडेला उपोषण सुरु

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील शेवटचे गाव जे गोवा राज्य कर्नाटक राज्य सीमेवर वसलेल्या विर्डी गावातील समस्या बाबत शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी कडून सतत दूर्लक्ष केले जाते, पाठपुरावा करून देखील दखल घेतली जात नाही. यासाठी विर्डी गावातील समस्या तातडीने सोडविण्यासाठी दोडामार्ग पंचायत समिती माजी उपसभापती तसेच विर्डी उपसरपंच एकनाथ गवस व ग्रामस्थ यांनी रस्ता कडेला पुलाजवळ उपोषणाला सुरूवात केली आहे. विर्डी गावातील खेळाचे मैदान या ठिकाणी रस्ता पुल नदीला लागून आहे. या ठिकाणी संरक्षण भिंत तसेच नवीन पुल बांधकाम करून मिळावे. या अगोदर या ठिकाणी अपघात देखील झाले आहेत. ही बाब निदर्शनास आणून बांधकाम विभाग याना पञ देऊन देखील कार्यवाही नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विर्डी गावातील काही ग्रामस्थ यांचे धरणामुळे पुनर्वसन केले. पण वीज खांब उभे केले पण काही ठिकाणी वीज खांब नाही. पाच खांब उभे करून वीज पुरवठा करावा, तसेच गावात मोबाईल रेंज नाही. येथे मोबाईल टॉवर शोभेचे बाहुले बनले आहे. शिवाय विर्डी गावातील धबधबा येथे जाण्यासाठी रस्ता खडीकरण करावा अशी मागणी केली पण दखल घेतली नाही, या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी उपसभापती तसेच सुनील गवस इतर ग्रामस्थ यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. दुपारपर्यंत कुणी उपोषण ठिकाणी दाखल झाले नव्हते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg