केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मुंबई गोवा महामार्गाचे कीतीही जलद गतीने काम करायचे म्हटल्यास पावसाळ्यापूर्वी पुर्ण होणे शक्य नाही. लांजा शहरातील उड्डाण पुलाचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. तसेच हातखंबा ते वाकेड दरम्यान ठिकठिकाणी बरीचशी कामे अर्धवट स्थितीत असल्यामुळे यंदाचा पावसाळाही असाच जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुबई गोवा महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण होईल असे सांगितले असल्यामुळे जनतेचे या कामाकडे डोळे लागुन राहीले आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली बारा वर्ष सुरू आहे. जनतेला बारा वर्ष रस्तचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची गटारांची कामे, अर्धवट स्थितीत असुन सर्व्हिस रोडचा पत्ताच नाही. उड्डाण पुलाच्या कामामुळे, वाहनधारक पादचारी यांना दरदिवशी कसरतीने आणि जीव मुठीत घेऊन ये-जा करणे भाग पडत आहे. मुबई गोवा महामार्गाचे चौपदरी करणाच्या कामाच्या अंदाज पत्रकामध्ये फुटपाथ चे काम नाही.
लांजा शहरात पादचाऱ्यांसाठी पदपथ(फुटपाथ) बनवण्यात आलेला नाही. त्यामुळे शहर व बाजारपेठेत खरेदी व अन्य कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावरून चालायचे की गटारावरून चालायच? गटारावरून चालायचे म्हटल्यास गटारावर टाकण्यात आलेला स्लॅब एकाच सरळ रेषेत नाही उंच सखल असल्यामुळे चालताना ठेच लागून पडणे, कींवा पाणी जाण्यासाठी ठेवण्यात आलेल्या गॅप मध्ये पाय गटारात जाऊन अपघात होण्याच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहर-बाजारपेठेत आणि अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी फूटपाथ असणे ही अत्यावश्यक बाब असताना तशी कोणत्या प्रकारची तरतूद सध्या तरी केलेली दिसत नाही. त्यामुळे लांजा शहरातील पादचाऱ्यांची सुरक्षिततेच प्रश्न निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.















































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.