loader
Breaking News
Breaking News
Foto

आगरनरळ येथील पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : माजी जि.प. सदस्य आणि तालुक्याचे पाणंद समिती अध्यक्ष बाबू पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आगरनरळ येथील पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. बेसिकसह युवा व महिला कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे आगरनरळमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकताच खंडाळा परिसरात दौरा केला होता. यावेळी माजी जि.प. सदस्य बाबू पाटील यांनी आयोजित केलेल्या खंडाळा महोत्सवाला भेट दिली. यावेळी महोत्सवात हजारो ग्रामस्थांचा उत्साह पाहून पालकमंत्री ना. सामंत यांनी अशाच पध्दतीने लोकांसाठी उपक्रम राबवण्याच्या सूचना बाबू पाटील यांना केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आगरनरळ परिसरातील राष्ट्रवादी श.प.चे विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजेंद्र महाकाळ, गावचे बेसिक अध्यक्ष राकेश मिंडे, माजी अध्यक्ष योगेश लवंदे, युवक अध्यक्ष सुदेश महाकाळ, माजी अध्यक्ष अजय लवंदे, महिला पदाधिकारी स्वरुपा गंधेरे, वेदिका दिवेकर, स्वामिनी मिंडे, अर्णवी महाकाळ, माजी उपसरपंच रघुनाथ लवंदे, माजी अध्यक्ष श्रीधर महाकाळ, माजी सरपंच बाळकृष्ण लवंदे, ग्रा.पं.सदस्य प्रकाश कांबळे, गंगाफळ मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रभाकर महाकाळ यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थांनी पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा झेंडा हाती घेत पक्ष प्रवेश केला.

टाइम्स स्पेशल

यावेळी ना. सामंत यांनी पक्षात योग्य तो मान दिला जाईल, ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास केला जाईल असे सांगितले. पाणंद समिती अध्यक्षपदी निवड झालेल्या बाबू पाटील यांना ग्रामीण भागातील जनतेच्या वाड्या, वस्त्यांसह शेताकडे जाणारे पाणंद रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. आपले सर्वोतोपरी सहकार्य राहील असे आश्वासनही ना. सामंत यांनी बाबू पाटील यांना दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg