संगलट खेड (प्रतिनिधी) - दापोली एसटी बस घेऊन जात असताना बसमधील प्रवाशांनी किरकोळ कारणावरून बस चालकास शिवीगाळ करत मारहाण आणि धक्काबुक्की केल्याची घटना दापोली येथे घडली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या विविध कलमान्वये अदखलपात्र गुन्ह्याची (एनसीआर) नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बस चालक साई विवेक कदम (वय २७, रा. काळकाई कोंड, दापोली) हे २२ एप्रिल २०२६ रोजी पहाटे बोरिवली ते दापोली ही बस (क्र. एम.एच. ४९ बी.ई. ८९४२) घेऊन येत होते. पहाटे साधारण ५:०० वाजण्याच्या सुमारास बस चिंचकाळी फाटा येथे आली असताना, राहुल ज्ञानेश्वर बिराजदार, गणेश बालाजी बिराजदार, नबाल सोमनाथ कांबळे आणि शुभम बसवराज पाटील (सर्व रा. काटगाव, जि. धाराशिव) या प्रवाशांनी बसमधून उतरताना किरकोळ वादातून चालक कदम यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, या चौघांनी चालक कदम यांना हाताने चापट मारून धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर चालक साई कदम यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संशयित आरोपींविरुद्ध कलम ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३५३(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश महादेव तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साखरे करत आहेत. सार्वजनिक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यावर प्रवाशांकडून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.















































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.