मुंबई -नारी शक्ती वंदन विधेयक म्हणजे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाले आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी केलेल्या विरोधाप्रकरणी भाजपने मंगळवारी वरळीतील जांबोरी मैदान ते एनएसएई डोम अशी ‘जन-आक्रोश महिला पदयात्रा’ काढली. मात्र याच यात्रेवेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांवर संताप व्यक्त केला. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनीही गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.
महिला आरक्षणासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सीरियल लायर अर्थात अट्टल खोटारडे आहेत. अशा विधानावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी, असे मला वाटत नाही. कारण खोटे बोलणाऱ्यालाच ते लागते. महिला विधेयकाविषयी ज्या पद्धतीने लोकांना भ्रमित करण्याचे काम सुरू आहे. कारण सप्टेंबर 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक पारित झाले आहे. राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्याचे नोटिफिकेशन जारी झाले आहे. हे विधेयक 2024 मध्ये लागू करण्यास तुम्हाला कुणी रोखले होते? जर आज महिला आरक्षण विधेयक लागू झाले असते तर सभागृहात 181 महिला पाहायला मिळाल्या असत्या, असे म्हणत नाना पटोले यांनी जातनिहाय जनगणनेवरही भाष्य केले.















































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.