loader
Breaking News
Breaking News
Foto

थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन, २३ एप्रिलला नियोजन बैठक

पनवेल - थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार दिनांक २३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सायंकाळी ५ वाजता उलवे नोड मधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा कार्यक्रम रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg