loader
Breaking News
Breaking News
Foto

निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या बंदुका जमा करू नका; अण्णा केसरकर यांची मागणी

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या काळात परवानाधारक बंदुका जमा करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने परवानाधारकांची योग्य पडताळणी करून शेती संरक्षणासाठीच्या बंदुका शेतकऱ्यांकडेच ठेवाव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या ग्रामीण भागात हत्ती, गवे आणि इतर वन्यप्राण्यांनी हैदोस घातला आहे. बंदुकीच्या आवाजामुळे हे प्राणी पळवून लावता येतात, मात्र शस्त्र जमा केल्यामुळे शेतीचे रक्षण करणे कठीण झाले आहे. नगर परिषद निवडणुकीनंतर आता पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बंदुका जमा करण्याचे आदेश दिले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात येण्या-जाण्यासाठी नाहक खर्च आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. ज्या परवानाधारकांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, त्यांच्या बंदुका सरसकट जमा करणे अयोग्य आहे. प्रशासनाने गैरवापर होणार नाही याची खात्री करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

टाइम्स स्पेशल

गेल्या आठ वर्षांपासून नवीन शेती संरक्षण परवाने मिळालेले नाहीत. तसेच, सुमारे १२०० मृत परवानाधारकांच्या वारसांचे नूतनीकरणाचे अर्ज प्रशासनाकडे धुळखात पडून आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. "शेतकऱ्यांनी बंदूक जमा करताना पोलीस ठाण्यात पडताळणी करून घेऊन पुन्हा ती घरी नेण्यासाठी प्रयत्न करावेत. शेती संरक्षणासाठी असलेल्या शस्त्रांचा गैरवापर होत नसेल, तर प्रशासन ती जमा का करून घेत आहे?" असा सवाल केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg