loader
Breaking News
Breaking News
Foto

आय.सी.एस. महाविद्यालयाचे जिओ डी.बी.जे. स्पर्धेत घवघवीत यश

सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने चिपळूण येथील डी.बी.जे. महाविद्यालयाच्या भूगोल विभागातर्फे Geo-DBJ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सहभाग घेऊन घवघवीत यश प्राप्त केले आहे. एकूण सहा स्पर्धा प्रकारांपैकी पाच प्रकारांत आय.सी.एस. महाविद्यालयाला पारितोषिके प्राप्त झाली. तसेच उपविजेतेपदाचा सर्वसाधारण चषक महाविद्यालयाला मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यात प्रामुख्याने Geo-Quiz या स्पर्धेत श्रेया कोकणी हिने प्रथम क्रमांक पटकावला. Location Tracing या प्रकारात गौरव निंबाळकर याने प्रथम क्रमांक तर Map Filling या प्रकारात सिध्दीकी मोहिते व श्रुती दिवाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. Tour Guide & Planning या प्रकारात आर्यन तांबे आणि दिक्षा जाधव यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच दृश्यम या प्रकारात आदित्य मोहिते व सिध्दांत जागुष्टे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

टाइम्स स्पेशल

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ऍड.आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी तसेच भूगोल विभागाचे प्रा. विपुल गायकवाड, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg