loader
Breaking News
Breaking News
Foto

निरवडे गावाने दिलेली साथ कधीही विसरणार नाही; उपनगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - "भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला सावंतवाडीच्या उपनगराध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली आहे. मात्र, हे यश संपादन करताना माझ्या निरवडे गावाने मला जी साथ दिली, ती मी कधीही विसरू शकणार नाही. मी शहराचा उपनगराध्यक्ष झालो असलो, तरी माझ्या गावातील ग्रामस्थांसाठी माझ्या कार्यालयाची दारे सदैव उघडी राहतील," असा भावनिक विश्वास नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी व्यक्त केला. ​निरवडे येथील श्री साटम महाराज कलाक्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी गावातील सुपुत्रांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​आपल्या भाषणात अ‍ॅड. निरवडेकर यांनी १९९७ मधील संघर्षाचे दिवस आठवले. ते म्हणाले, "सावंतवाडीत प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा अनेक दिग्गज वकील तिथे होते. सुरुवातीला साधी कामे मिळणेही कठीण होते, पण अशा वेळी माझ्या निरवडे गावातील लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला कामे दिली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो." ​गावातील युवक मोठ्या संख्येने भारतीय सैन्य दलात जात असल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. "गावातील तरुणांमध्ये मोठी 'क्वॉलिटी' आहे. त्यांनी केवळ नशिबावर अवलंबून न राहता प्रयत्नात सातत्य ठेवावे," असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच, गावातील कोणत्याही व्यक्तीला शहरात अडचण आल्यास हक्काने कार्यालयात येण्याचे आवाहनही त्यांनी केले. ​या सोहळ्यात भारतीय सैन्य दलात भरती झालेले पियुष बर्डे व वेदांत पारकर, शरीरसौष्ठवपटू वासुदेव वैज आणि आरटीओ अधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. साटम महाराज कला क्रीडा मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, या कार्यासाठी आपण नेहमी सोबत असू, असेही निरवडेकर यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

​या कार्यक्रमाला सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, माजी सरपंच हरी वारंग, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते नागेश गावडे, नयनेश गावडे, पोलीस पाटील अजित वैज, संतोष गावडे, बाबल सावळ, प्रकाश माळकर, संजय तानावडे, रमेश बोंद्रे, दत्ताराम गावडे, सुनील माळकर, रोहन मल्हार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न सोनुर्लेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg