loader
Breaking News
Breaking News
Foto

खामशेत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नळपाणी योजना श्री दत्तकृपा स्वयंसहाय्यता गट चालवणार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतने १०० टक्के घरपट्टी व नळपट्टी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तारखेला भरून आदर्श निर्माण केला आहे. खामशेत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक घरात पाणीपुरवठ्याचे नळ कनेक्शन देण्यात आले आहे. तर यावेळी जागतिक जलदिन निमित्ताने खामशेत गावाची नळपाणी पुरवठा योजना गावातीलच श्री दत्तकृपा स्वयंसहाय्यता महिला बचत गटाला देण्यात आली आहे. ही नळपाणी योजना आता महिला बचत गट चालवणार आहे. याद्वारे एकप्रकारे महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेमार्फत यापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील वळके मराठवाडी पाणी योजना, लांजा तालुक्यातील निवोशी इंदवटी पाणी पुरवठा योजना महिला बचतगटांकडे सोपवण्याचा क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला होता. जागतिक जलदिनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विविध संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. यामध्ये पाणी आणि लिंगभाव यावर आधारित यावर्षी जलदिन साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जास्तीत जास्त महिला व मुलीना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करणे हा मुख्य उद्देश यावेळी ठेवण्यात आला आहे. ८ मार्च ते २२ मार्च या कालावधीत जल महोत्सव साजरा करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने करण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे खामशेत गावात जलअर्पण दिवस साजरा करून ही योजना गावाकडे सुपूर्द करून स्वामीत्वाचा उत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी जल जीवन अंतर्गत घर घर नळ ही योजना पूर्ण झालेल्या खामशेत ग्रामपंचायतीकडे चर्चा करून ही नळयोजना स्वयंसहाय्यता महिला बचत गटाकडे सुपूर्द करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे खामशेत ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या खामशेत नळपाणी पुरवठा योजना श्री दत्तकृपा स्वयंसहाय्यता महिला बचत गटाकडे करार तत्वावर सोपवण्यात आली असून या योजनेचा संपूर्ण कार्यभार आता बचत गट पहाणार आहे. खामशेत ग्रामपचायतीअंतर्गत खामशेत व पारदळेवाडी अशा दोन नळपाणी पुरवठा योजना आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे ३५० नळ कनेक्शन असून खामशेत गावाची नळपाणी योजनेचे ११० नळ कनेक्शन आहेत. या योजनेची कराची वसुली, योजना सुरळीत सुरू ठेवणे, दुरुस्ती आदी संपूर्ण कामकाज खामशेत येथील श्री दत्तकृपा स्वयंसहाय्यता महिला बचत गट पाहणार आहे.

टाईम्स स्पेशल

तालुक्यातील खामशेत गावातील पेवे खामशेत शाळा क्र ३ येथे जल महोत्सव साजरा करण्यासाठी खामशेत गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी व अधिकारी याच्या उपस्थितीत विहिरीचे पूजन करून विहिरीतील पाण्याने भरलेले कलश महिलांना डोक्यावरून आणून त्यांचे पूजन केले. त्यानंतर योजना बचत गटाकडे चालवण्यास देण्याचा करार बचत गटाला सुपूर्द करण्यात आला. यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती नीतेश सुर्वे, सदस्या उर्वी खैर, स्नेहा शिगवण, प्रशासक मंगेश सोलकर, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, गटविकास अधिकारी परेश शिरसाट, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता दीप्ती धारप, विस्तार अधिकारी शरद मांड, ग्रामपंचायत अधिकारी रमेश मोहिरे, महिला बचत गटातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg