loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवली नंबर १ शाळेची विद्यार्थिनी प्रांजल कांबळे हिची नवोदय विद्यालयात निवड

देवळे (प्रकाश चाळके) - जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि आव्हानात्मक समजली जाणारी 'जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा' नुकतीच संपन्न झाली. या परीक्षेत संगमेश्वर तालुक्यातील देवळे केंद्रातील जिल्हा परिषद शाळा चाफवली नंबर १ ची विद्यार्थिनी प्रांजल परेश कांबळे हिने घवघवीत यश संपादन करत नवोदय प्रवेशासाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. ​प्रांजलच्या या यशाने केवळ शाळेचेच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यश मिळवले, की आभाळही ठेंगणे होते, हे प्रांजलने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रांजलला या कठीण परीक्षेच्या तयारीसाठी कै. गजानन मोघे, केंद्रप्रमुख संतोष बोडेकर, निलम सोलापुरे, वर्षाराणी कदम, संगीता मगदूम, शिवाजी काळे, सोनाली काळे तसेच इतर शिक्षक वृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांनी घेतलेली विशेष मेहनत आणि प्रांजलच्या चिकाटीने केलेला अभ्यास यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे बोलले जात आहे. चाफवली शाळा नं.1 नेहमीच स्पर्धा परीक्षांमध्ये आपले विद्यार्थी आणत असते. इस्रो नासासाठी गेली तीन वर्ष आपले विद्यार्थी आणून हॅट्रिक ही साधली आहे. शिक्षक वर्गाच्या मेहनतीने हे शक्य झाले आहे.

टाईम्स स्पेशल

प्रांजलच्या या ऐतिहासिक यशाबद्दल शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले आहे. यामध्ये ​विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव ​माजी मुख्याध्यापक हिमाली शिंदे व शिंदे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निशा गवळी, सदस्य संजय चाळके, वसुधा चाळके ​यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी प्रांजलचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg